सचिन आणि संगीता अहिर यांच्या 'वरळी फेस्टिव्हल' मधील संगीत, कला, सांस्कृतिक कार्यक्रमात रंगली वरळी

Sachin Ahir and Sangeeta Ahir

संगीता आणि सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आयोजित केलेला दोन दिवसीय 'वरळी फेस्टिवल' हा उत्साहवर्धक वातावरणात धमाकेदारपणे २६ आणि २७ जानेवारी रोजी  पार पडला. वरळी सी फेसचे रूप या दोन दिवसांसाठी पूर्णपणे पालटून गेले होते. वरळी समुद्रकिनारा हा विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य संस्कृती, खेळ, विविध गोष्टींची आणि पदार्थांची भव्य दिव्य बाजारपेठ आणि लोकनृत्य, संगीत या सगळ्याने सजला होता.