song lyrics थांब किंचित थांब of KRUTANT

thamb Kinchit thamb

रुटीन चा राडा, पळतोय घोडा
डोक्याचा रोज आखाडा
खोडरबर साला लाइफ झालया
घासून सरतोय थोडा थोडा थोडा थोडा
टेन्शन फुल, इमोशन गुल
फ्रसट्रेशन झालया जाम
कशासाठी किती किती किती कुठे धावशील
आता तरी किंचित थांब
थांब थांब थांब किंचित थांब

कशासाठी पोटासाठी तीच तीच वाटाघाटी
रोज नवी धावाधाव
किती खरी किती खोटी
भूक नाही तहान नाही, घड्याळाचं भान नाही,
कोणामागे धावतोय तुझी तुला जाण नाही
मन नाही थाऱ्यावर
सोड सारे वाऱ्यावर
पुरे झाली मरमर
दिस जाती भर भर
स्वतःसाठी घडीभर थांब

थांब थांब थांब किंचित थांब

अरे इनक्रिमेंटच्या लोण्यासाठी अड्जस्टमेंट ची हाईट
बघता बघता भाऊ तुझा शेड्युल झाला टाईट
झोप गेली तेल लावत ,फिगर झाली गोल
रीलेशन च्या राड्यामध्ये रोज नवा झोल
बीपी आणि शुगर झालं बघ ना ट्रिगर
फुटेल ना बे कधीतरी बॉम्ब
थांब थांब थांब किंचित थांब