कृतांत हा सैराट चित्रपटासारखा यशाची पायरी चढू शकेल का?

मराठी चित्रपटसृष्टीच्या दमदार कथाकथनाच्या परंपरेला सार्थ ठरवणारे अनेक चित्रपट आजपर्यंत आपण पाहिले. एप्रिल २०१६ ला आलेल्या ‘सैराट’ने १०० करोड पार करून आजपर्यंत कधीही न घडलेला इतिहास घडवला. आज दोन वर्षांनंतरही ‘सैराट’ची जादू कायम आहे. अशी किमया सध्या जर कोणत्या चित्रपटातून दिसत असेल तर तो आहे, संदीप कुलकर्णी आणि सुयोग्य गोऱ्हे अभिनीत ‘कृतांत’ हा आगामी थरारपट!

चित्रपट समीक्षक आणि अभ्यासकारांच्या मते, ‘कृतांत’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर नक्कीच धुमाकूळ घालेल यात शंका नाही. जाणकार सिनेवितरक या चित्रपटाची मनापासून वाट पाहात आहेत. ‘कृतांत’च्या आगळ्यावेगळ्या कथेसॊबतच अर्थपूर्ण संवाद आणि सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेलं ‘थांब किंचीत थांब’ हे गीत जनमानसात ‘आपलं गीत’ म्हणून प्रसिद्ध होतंय.
 
याची अनुभूती घेण्यासाठी हा ट्रेलर आणि ‘थांब किंचीत थांब’ हे गीत पुन्हा एकदा बघा. 

Krutant trailer

दत्ता मोहन भंडारे यांचं दिग्दर्शन, मिहीर शाह यांची निर्मिती असणाऱ्या या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी, सुयोग्य गोऱ्हे आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘कृतांत’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा येत्या १८ जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. नक्की बघा!